(चालू घडामोडी) Current Affairs | 8 November 2019

नवी दिल्लीत प्रथम ‘BIMSTEC बंदरे परिषद’ आयोजित

 • 7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर 2019 रोजी नवी दिल्लीत ‘BIMSTEC बंदरे परिषद 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेची ही पहिली आवृत्ती असून भारत सरकारचे जलवाहतूक मंत्रालय त्याचे आयोजन करीत आहे.
 • बंगालचा उपसागर या प्रदेशात भारताचे वाढते हितसंबंध याला बघता ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरते. तसेच ही परिषद सागरी सुरक्षेसंबंधी भारताच्या उपाययोजनांसाठी आणि हिंद-प्रशांत प्रदेशातल्या स्वारस्यासाठीचा मार्ग ठरणार आहे.
 • बंदरांची उत्पादकता आणि सुरक्षिततेसाठी गुंतवणूकीच्या संधी आणि सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा केली जात आहे. हे चर्चासत्र “पोर्ट लीड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड टुरिझम डेव्हलपमेंट” या विषयावर आयोजित केले गेले आहे. या कार्यक्रमामुळे क्रूझ पर्यटनास प्रोत्साहन मिळण्याचे अपेक्षित आहे.
 • कार्यक्रमादरम्यान जागतिक पुरवठा साखळीमध्ये बंदरांची भूमिका, सुरक्षित बंदरे, हरित उपक्रम अश्या विविध मुद्द्यांवर चर्चा चालणार आहे.

एडीबी भारताला 451 दशलक्ष डॉलर्स देईल

 • तामिळनाडूमधील चेन्नई-कन्याकुमारी औद्योगिक कॉरिडोर (सीकेआयसी) च्या दक्षिण आणि उत्तर भागांमधील वीज जोडणी मजबूत करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक $1451 दशलक्ष (सुमारे 3,200 कोटी रुपये) कर्ज देईल.
 • या प्रकल्पाची एकूण किंमत $653.5 दशलक्ष आहे, त्यापैकी सरकार $202.5 दशलक्ष डॉलर्स देईल.
 • प्रकल्प अंदाजे पूर्ण होण्याची तारीख 2024 आहे.

जागतिक जकात संघटनेकडून भारताच्या ‘खादी’ याला ‘HS कोड’चा दर्जा बहाल केला

 • जागतिक जकात संघटनेच्या निर्णयानुसार, भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने भारताची ओळख समजल्या जाणार्‍या ‘खादी कपडा’ याला स्वतंत्र ‘HS कोड’ बहाल केला आहे. (HS म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टम)
 • जागतिक जकात संघटना (WCO) कडून ‘HS कोड’ची स्थापना करण्यात आली आहे. ही बारकोड प्रमाणेच एक सांकेतिक ओळख असते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा प्रवेशाच्या वेळेस तपासणी अधिकार्‍यांकडून तपासणी केल्या जाणार्‍या मालाला त्यांची परवानगी देण्यामध्ये मदत करते आणि त्यामुळे मंजुरी मिळविण्यास लागणारा वेळ कमी होतो.
 • हे एक बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय नामकरण आहे जे दळणवळण केल्या जाणार्‍या वस्तूंच्या प्रकाराचे वर्णन करते. ही ओळख 1974 सालाच्या क्योटो करारनाम्यात नमूद असलेल्या बाबींना अनुसरण तयार करण्यात आली आहे. 200 पेक्षा जास्त देश या व्यवस्थेचा वापर करीत आहेत.
 • आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आकडेवारीच्या संकलनात या व्यवस्थेची देशांना मदत होते आणि जकात शुल्कासाठी आधारभूत ठरवले जाते. हे उत्पादनास अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यास मदत करते आणि त्याची जागतिक लोकप्रियता वाढवते.

वेणू श्रीनिवासन ‘डेमिंग पुरस्कार’ जिंकणारे पहिलेच भारतीय उद्योगपती

 • डेमिंग पुरस्कार हा जपानच्या वैज्ञानिक व अभियंत्यांचा महासंघ ‘जेयूएसई’द्वारे प्रायोजित केला जातो.
 • टीव्हीएस मोटर कंपनी आणि सुंदरम क्लेटन या कंपन्यांचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांना प्रतिष्ठेच्या डेमिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 • टोक्यो (जपान) येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय उद्योगपती आहेत.

सर्वात वेगवान २००० धावा करणारी मंधाना जगातील तिसरी फलंदाज

 • भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मंधानानं कारकिर्दीतील ५१व्या वनडेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वनडेमध्ये सर्वाधिक वेगानं २००० धावा करणारी भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराटलाही तिनं याबाबतीत मागे टाकलं आहे.
 • स्मृतीनं हा विक्रम वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत केला आहे. स्मृती मंधानानं वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ७४ धावांची तडाखेबंद खेळी केली.
 • तिनं या डावात युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिच्यासोबत पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी रचली. जायबंदी असल्यामुळं पहिल्या दोन सामन्यांमध्ये ती खेळली नव्हती. मंधानानं तिसऱ्या सामन्यात ६३ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या.
 • तर रॉड्रिग्जनं ९२ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या. भारतानं हा सामना सहा विकेट राखून जिंकला. २३ वर्षीय मंधानानं ५१ डावांमध्ये २००० धावा केल्या. सर्वात वेगवान २००० धावा करणारी मंधाना जगातील तिसरी फलंदाज ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here