(चालू घडामोडी) Current Affairs | 9 January 2020

गुजरातमध्ये ‘विक्रम साराभाई चिल्ड्रेन इनोव्हेशन सेंटर’ उभारणार

 • गुजरात राज्यात ‘विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर’ उभारण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी ह्यांनी केली आहे.
 • 6 जानेवारी 2020 रोजी गांधीनगर येथे ‘चिल्ड्रेन्स इनोव्हेशन फेस्टिवल’ या कार्यक्रमाच्या सत्कार समारंभात बोलताना ही घोषणा केली गेली.
 • ठळक बाबी: ‘विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर’ राज्यातल्या लहान मुला-मुलींमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणार. त्यांना नवसंशोधन करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
 • हे केंद्र नावकल्पना मांडणार्‍या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना त्या दिशेने कार्य करण्यासाठी पाठबळ पुरविणार आहे.
 • हे केंद्र गुजरात विद्यापीठाच्या ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेंटर फॉर एक्सटेंशन रिसर्च अँड इनोव्हेशन’ येथे उभारले जाणार आहे.
 • गुजरात विद्यापीठ आणि संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) यांच्या संयुक्त भागीदारीतून ही सुविधा उभारली जाणार आहे.

31 वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

 • गुजरातमध्ये 31 व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे. 7 जानेवारी 2020 रोजी साबरमती नदीच्या किनारी या कार्यक्रमाचे उद्घाटन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केले.
 • ठळक बाबी: हा कार्यक्रम 14 जानेवारी 2020 पर्यंत म्हणजेच मकरसंक्रांतीपर्यंत चालणार आहे. राज्याच्या विविध भागात पतंगोत्सव साजरा केला जातो.
 • या कार्यक्रमात 40 देशांमधून 140 हून अधिक पतंग उड्डाण तज्ञ सहभागी होत आहेत. याशिवाय गुजरातमधून सुमारे 800 आणि इतर 12 राज्यांमधून 200 जन या अनोख्या उत्सवात सहभागी होत आहेत.
 • केवडिया, सूरत आणि वडोदरासह राज्यभरात इतर नऊ ठिकाणी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित केला जात आहे.

बॅडमिंटन : राष्ट्रीय स्पर्धेत उदिथ, लिखिता चॅम्पियन; महाराष्ट्राला विजेतेपद

 • ६५ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत उदिथ अाणि लिखिताने किताबाची कमाई केली. हे दाेघेही अापापल्या गटात चॅम्पियन ठरले. मुलांच्या अंतिम सामन्यात केरळच्या एन.पी.उदिथ याने दिल्लीच्या शौर्य सिंगचा पराभव केला. त्याने २१-१७,२२-२० ने अंतिम सामना जिकंला.
 • यासह त्याने अजिंक्यपद पटकावले. मुलींच्या अंतिम सामन्यात डी.ए.व्ही. कॉलेजच्या लिखिता श्रीवास्तव हिने महाराष्ट्राच्या रुद्रा राणे हिच्यावर २१-१७, २३-१३ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत मुलींमधील अजिंक्यपद पटवले.
 • उपांत्य सामन्यांमध्ये मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निराशा केली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या रोहन थूलचा केरळच्या एन.पी.उदिथ ने पराभव केला. महाराष्ट्राच्याच तनिष्क सक्सेनाला दिलीच्या शौर्य सिंगने २०-२२, २१-१६, २१-१२ अशा फरकाने पराभूत केले.

काश्मीरच्या स्थितीचा आढावा घेणार १६ देशांचे प्रतिनिधी

 • अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांच्यासह १६ देशांच्या राजदूतांना केंद्र सरकार काश्मीरचा आढावा दौरा घडवणार आहे. गुरुवारपासून सुरु होणारा हा दौरा दोन दिवस चालणार आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर परदेशी राजदूतांचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे.
 • परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध देशांच्या दिल्लीस्थित दुतावासात नियुक्तीवर असलेले हे राजदूत गुरुवारी पहिल्यांदा श्रीनगर येथे जातील आणि तिथली परिस्थिती जाणून घेतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जम्मूला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते उपराज्यपाल जी. सी. मुर्मू आणि सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांची भेट घेतील.
 • या प्रतिनिधीमंडळात अमेरिका, बांगलादेश, व्हिएतनाम, नॉर्वे, मालदीव, दक्षिण कोरिया, मोरोक्को, नायजेरिया आणि इतर देशांचे राजदूत सहभागी होणार आहेत. ब्रझीलच्या राजदूतांनाही या दौऱ्यावर जायचे होते परंतू दिल्लीत महत्वाचे काम असल्याने त्यांनी दौऱ्यातून माघार घेतली.
 • यापूर्वी युरोपियन संघाच्या २३ खासदारांनी जम्मू-काश्मीर राज्याचा दौरा केला होता तसेच कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या तिथल्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली होती. मात्र, या दौऱ्याचे आयोजन आणि व्यवस्था एका एनजीओच्यावतीने करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here