महाराष्ट्र : अर्थव्यवस्था, सहकार, शिक्षण – भाग पहिला

महाराष्ट्र : अर्थव्यवस्था

  • देशातील अन्य भागाप्रमाणेच राज्याची अर्थव्यवस्था ही कृषिकेंद्रित होती, कृषी उत्पादन व हस्तव्यवसाय ही तेव्हाचे उद्योगधंदे होते.
  • ब्रिटिश कालावधीत मुंबई, सोलापूर, नागपूर येथे वस्त्रोद्योग विकसित झाला. विदर्भात खान उद्योगाचा प्रारंभ झाला.
  • मुंबईत १८७५ मध्ये भारतातील पहिला शेअर बाजार स्थापन झाला.
  • राज्यात सहकार कारखान्याचा विकास सर्वात जास्त झाला झाला. याशिवाय बँका, सूतगिरण्या इत्यादी सर्व सहकारामुळेच शक्य झाले.
  • मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे या भागातच उद्योग जास्त प्रमाणात उभे राहिले.
  • औद्योगिक विकासात तसेच भांडवल आकर्षित करण्यात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्र : सहकार क्षेत्र

  • देशातील पहिला सहकारविषयक कायदा १९०४ मध्ये संमत करण्यात आला. जुन्या मुंबई राज्यात १९२५ मध्ये सहकार कायदा करण्यात आला.
  • सहकार क्षेत्राचे प्रणेते – गोपाळ कृष्ण गोखले, वैकुंठलाल मेहता, चुनीलाल मेहता, रमणभाई सरय्या, जि के देवधर, विठ्ठलदास ठाकरसी, ध रा गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, रत्नप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे पाटील, शरद पवार, बिंदूभाऊ जोशी.
  • देशातील पहिली सहकारी सूतगिरणी – कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी.
  • भारतातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी – डेक्कन को – ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल इचलकरंजी
  • राज्यातील एकमेव औद्योगिक सहकारी बँक – सोलापूर
  • देशातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत – इचलकरंजी
  • महाराष्ट्रातील पाहिला साखर कारखाना – प्रवरानगर जि. अहमदनगर
  • आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना – शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली.
  • लष्करातील जवानांसाठी एकमेव सहकारी बँक – सातारा.
  • महाराष्ट्रातील पाहिले सहकारी डिपार्टमेंट स्टोर – अपना बाजार, मुंबई
  • महाराष्ट्रतील पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था – शारदाश्रम मुंबई
  • महाराष्ट्रतील पहिली सहकारी बँक – दि शामराव विठ्ठल को बँक मुंबई
  • महाराष्ट्रातील व देशातील पहिली धान्य बँक – सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे १९६० मध्ये स्थापन करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here