महाराष्ट्र: झलक (भाग 1)

महाराष्ट्र – स्थान, स्थापना, विभाग

 • महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली.
 • महाराष्ट्राचे कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ हे चार प्रादेशिक विभाग आहेत.
 • महाराष्ट्राचे स्थान पश्चिम भारतात असून अक्षांश १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर, तर रेखांश ७२.६ पूर्व तर ८०.९ पूर्व आहे.
 • महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस – दादरा नगर हवेली, व गुजरात, उत्तरेस – मध्य प्रदेश, पूर्वेस – छत्तीसगड, आग्नेयेस – आंध्रप्रदेश, आणि दक्षिणेस – कर्नाटक व गोवा आहेत.

महाराष्ट्र – प्रशासकीय विभाग – जिल्हे [६]

 • कोकण विभाग – मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग
 • नाशिक विभाग – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर
 • पुणे विभाग – पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा
 • औरंगाबाद विभाग – औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर
 • अमरावती विभाग – अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम
 • नागपूर विभाग – नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

महाराष्ट्र प्राकृतिक

 • महाराष्ट्रच्या पश्चिमेस अरबी समुद्र पूर्वेस सह्यांद्री पर्वत, उत्तरेस सातपुडा पर्वत, आहे.
 • महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे हे अहमदनगर व नाशिक या जिल्यात असून त्याची उंची १६४६ मी आहे.
 • महाराष्ट्रात सुमारे ९०% भूभाग हा बेसॉल्ट म्हणजेच अग्नीजन्य खडकांनी बनलेला आहे.
 • महाराष्ट्रात महाबळेश्वर, तोरणमाळ, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत.
 • महाराष्ट्रात काळी कापसाची रेगूर मृदा ही सर्वात जास्त असून तिची सुपीकता अधिक आहे.

महाराष्ट्रातील धरणे – नदी – जिल्हा

No. धरणे नदी जिल्हा
1 भंडारदरा प्रवरा अहमदनगर
2 कोयना कोयना सातारा
3 भाटघर येळवंडी पुणे
4 धोम कृष्णा सातारा
5 पानशेत अंबी पुणे
6 जायकवाडी गोदावरी औरंगाबाद
7 खडकवासला मुठा पुणे
8 बिंदुसरा बिंदुसरा बीड
9 मुळशी मुळा पुणे
10 तानसा तानसा ठाणे
11 गंगापूर गोदावरी नाशिक
12 मोडकसागर वैतरणा ठाणे
13 चाणकपूर गिरणा नाशिक
14 तोतलाडोह पेंच नागपूर
15 राधानगरी भोगावती कोल्हापूर
16 दारणा दारणा नाशिक
17 येलदरी पूर्णा हिंगोली
18 सिद्धेश्वर पूर्णा हिंगोली
19 उजनी भीमा सोलापूर
20 वीर नीरा पुणे

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here