प्राचीन सिंधू संस्कृती

सिंधु संस्कृति ही भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे. ही संस्कृति प्रामुख्याने सिंधू नदी,सरस्वती नदी व सिंधूच्या उपनद्याकाठी (पंजाबातील ५ मुख्य नद्याच्याकाठी) अस्तित्वात होती. तसेच गंगा यमुना खोरे ते उत्तर अफगणिस्तानपर्यंत ही संस्कृती बहारली.

सिंधू संस्कृतीचा शोध

इ.स. 1921 मध्ये दयाराम सहानी यांनी सिंधू संस्कृती असण्याचा शोध लावला. त्याच वर्षी पंजाबातील हड़प्पा येथे प्रायोगिक उत्खनन करण्यात आले होते आणि या उत्खनना नंतर सिंधु संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरूप स्पष्ट झाले. तर  राखालदास बॅनर्जी यांनी इ.स. 1922 मध्ये मोहें-जो-दडोचा शोध लावला .

याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे प्रकाशात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.

सिंधू संस्कृती आधुनिक भारत (पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात व पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य प्रांत) भूभागावर वसलेली होती. त्यातील बराचसा भाग आधुनिक पाकिस्तानात असला तरी सिंधू संस्कृतीत आजच्या भारतीय संस्कृतीची पुरावे सापडतात. ही संस्कृती प्राचीन इजिप्त व इराकमधील मेझोपोटेमिया या संस्कृतीं इतकी जुनी आहे. सिंधू संस्कृतीतील रहिवाश्यांनी धातूंचा वापर सूरु केला. मोहंदोजरो, हराप्पा येथे उत्खनात सापडलेल्या शहरांवरुन सिंधू संस्कृतीची ओळख मिळते.

सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती हे एकच होती का यावर तज्ञांमध्ये वाद आहेत. नंतर आलेल्या वैदिक आर्यांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण केले व कालांतराने नष्ट झाली. असा एक मतप्रवाह आहे जो आजवर ग्राह्य धरण्यात आला होता. तर सिंधू संस्कृती व वैदीक संस्कृती एकच होती व सिंधू संस्कृतीवर कोणत्याही प्रकारची बाह्य आक्रमणे झाली नाहीत परंतु कालांतराने बदलली व जी शहरे नष्ट झाली ती प्रामुख्याने हवामानातील बदल, नद्यांच्या पात्रातील बदल व मोठेमोठे पूर यांनी नष्ट झाली.

सिंधू संस्कृतीचे वैशिष्टे

  • सिंधू संस्कृतीला जगातील सर्वात मोठी संस्कृती समझले जाते. विशेषत रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था याची सुनियोजित व्यवस्था करण्यात आली होती.
  • आरोग्य व स्वच्छतेसाठी बंद गटारांची व्यवस्था होती
  • मोहेनजोदड़ोचे स्नानगृह प्रसिद्ध आहे. याची 12 मीटर लांब, 7 मीटर रूंद आणि 2.5 मीटर उंचीचे स्नानगृह मिळाले आहे.
  • नगररचना योजनाबद्ध होती.

जीवनप्रणाली

  • येथील लोकांच्या आहारात तांदुळ, गहू, सातू, खजूर, मांस, मासे, भाज्या व फळे यांचा वापर असावा असे दिसून येते.
  • येथील लोक सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचा वापर करून दागिने बनवत असे.
  • हे लोक करमणुकीसाठी नृत्य, संगीत व सोंगाट्या व फासे यांचा खेळ खेळत असे.

धार्मिक संकल्पना

  • हडप्पाकालीन उत्खननात मिळालेल्या मातृदेवतेची मूर्ती पूजा आणि अग्निचे अवशेष दर्शवतात के येथील लोक निसर्गपूजा व मातृपूजक होते असे स्पष्ट होते.
  • शेती आणि व्यापार हा प्रमुख व्यवसाय होता.  शेती मध्ये गहू, तांदूड, कापूस, सातू, कडधान्ये इ. पिकांचे उत्पादन घेण्यात याचे.
  • भांडी तयार करणे आणि त्यावरच चित्रकला काढणे हा एक अन्य व्यवसाय होता. कापूस व लोकरीचे धागे तयार करणे पण एक  व्यवसाय होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here