वैदिक संस्कृती

वैदिक संस्कृती ला आर्यांची संस्कृती म्हणून ओळखले जाते. सिंधू संस्कृतीनंतर वैदिक संस्कृतिचा उदय झाला. आर्य यांना वैदिक संस्कृतीचे निर्माते म्हणटले जाते. काही विद्वानांच्या मते आर्यांचे मूळ स्थान मध्य आशिया आहे, तेथूनच आर्य भारतात आले आणि स्थायी झाले.

लोकमान्य टिळकांच्या मते आर्क्टिक प्रदेश हेच आर्याचे मूळ वसतिस्थान आहे, परंतु हे मत ग्राह्य धरले जाते. आर्य हे भारता बाहेरून आले आहे , हे मत अनेक विद्वानांना मान्य नाही भारतच आर्यांचे मूळ वस्तिस्थान आहे असे त्यांचा दावा आहे. सिंधू नही व तिच्या उपनद्या आर्यांचा मूळ स्थान असावा. अशा विभिन्न मत असल्याने आर्यांचे मूळ स्थान कोणते हा वादग्रस्त मु्द्दा आहे. विद्वानांचे एक मत नाही तरी आर्यांचे मूळ स्थान मध्य आशिया हे होते असे मत ग्राह्य धरले आहे.

आर्यांची वस्ती सप्तसिंधूच्या प्रदेशात होती. हळू-हळू ते पूर्वेकडे गंगा-यमुनेच्या खोर्याकडे सरकले. आर्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या त्यातील प्रमुख भरत, पुरू, कुरू, यदू, संजय टोळ्या होत्या. या टोळ्यांमध्ये निहमी एकमेकांशी संघर्ष होत असे. या काळात राजेशाही अस्तित्वात होती, राजा हा राज्याचा प्रमुख असे.

आर्यांमध्ये सुरवातीला वर्णव्यवस्था होती. हे वर्ण व्यवसाया वरूण निर्धारीत करण्यात आले होते. वैदिक काळात जाती व्यवस्था अस्तित्वात नव्हती परंतु वर्ण व्यवसायातूनच जाती व्यवस्था अस्तित्वात आली. कुटुंबसंस्था समाजातील एक महत्वपूर्ण संस्था मानली जात होती. पितृसत्ताक पद्धती हे आर्य समाजीक जीवनाचे एक महत्वपूर्ण वैशिष्टय होते. विवाह एक पवित्र संस्कार मानला जात होता, लग्न हे वयात आल्यावरच होत असे बालविवाहची पद्धती वैदिक काळात नव्हती. तर मुलामुलींना जोडीदार निवडण्याते स्वातंत्र्य होते तरी ही त्या संबंधी काही सामाजीक निर्बंध असे. तर वैदिक काळात स्त्रीयांना ही महत्वाचे स्थान होते, त्याकाळी सती प्रथाही अस्तित्वात नव्हती. निपुत्रिक विधवा स्त्री नियोगपद्धतीने संतती प्राप्त करून घेऊ शकत असे. त्याकाळी काळी लोपमुद्रा, विश्ववारा, घोषा, अपाला, निकाता इत्यादी पंडिता होऊन गेल्या.

आर्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता, शेतीसाठी ते बैलांचा वापर करीत असत. पशु व्यवसाय ही महत्वाचा व्यवसाय होता. आर्यांच्या आहारात गहू, बार्ली यांसारखी धान्ये, दूध, दही, फळे, भाजीपाला, पशुचे मांस इत्यादींचा समावेश असे. ते मद्यपान करीत असे. सुती व लोकरीचे कपडे वापरात होते.

आर्यांना संगीतात विशेष रूची होती. वेबर च्या मते सप्तसुरांचा उगम भारतात झाला आहे. दुंदुभी, वीणा, वेणू, कर्करी, गर्गर, बकूर इत्यादी वाद्ये त्या काळी प्रचारात होती.

असेच मतभेद वैदिक संस्कृतीच्या काळा बद्दल ही आहेत. याकोबी याने वैदिक संस्कृतीचा कालखंड इ.स.पू. 4500 ते इ.स.पू. 2500 असा दिला आहे. तर लोकमान्य टिळकांनी ऋग्वेदाचा काळ इ.स.पू. 6000 वर्षे प्राचीन असवा असे मत दिले आहे. मॅक्समुलर ने इ.स.पू.1200 वर्षे असे असल्याचे मत दिले. सर्व संशोधन पुराव्यावरून इ.स.पू. 1500 ते इ.पू.1000 वर्षे वैदिक संस्कृतीचा कालखंड निश्चित करण्यात आला आहे.

वैदिक काळातच वैदिक वाङ्मयाची निर्मीती करण्यात आली. यात चार प्रकाराच्या ग्रंथांचा अंतर्भाव होतो. ते ग्रंथप्रकार पुढीलप्रमाणे आहेत-

  1. संहिता: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद.
  2. ब्राह्मणे: ही बव्हंशी गद्यात असून त्यांत  देवादिकांच्या कथा, यज्ञविचार, यज्ञविधी. आध्यात्मिक संबंध याचा भाग आहे.
  3. आरण्यके व उपनिषदे: ऋषीमुनींचे तत्वज्ञान, प्राणीमात्रांचे जीवन, ईश्वर, आत्मा, विश्व यासंबधीची चर्चा करण्याच आली आहे.

आपण खालील मह्तावच्या वेदांची थोडक्यात माहिती घेऊया-

  1. ऋग्वेद: हा सर्वात प्राचीन वेद आहे. यात एकून 10 मंडले , 1 हजार 28 सूक्ते व 10 हजार 552 ऋचा आहेत. वैदिक देवतांना आळविण्यासाठी म्हटलेल्या ऋचांचा समावेश आहे.
  2. यजुर्वेद:  यज्ञाच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्यांना यजुस असे नाव आहे. यजुर्वेदाचे दोन भेद आहेत ते म्हणजे (अ) शुक्ल यजुर्वेद व (ब) कृष्ण यजुर्वेद. यजुर्वेदाच्या एकूण सहा संहिता आहेत.
  3. सामवेद: हा वेद सर्वात लहान वेद आहे यातील बहुसंख्य ऋचा ऋग्वेदातीलच आहेत. या यज्ञसमयी गाण्याच्या ऋचा होत. भारतीय संगीताच्या माहिती होण्याच्या दृष्टीने सामवेद उपयुक्त ठरतो. सामवेदाचे आर्चिक, उत्तरार्चिक असे दोन भाग आहेत.
  4. अथर्वेद: अथर्वेदात जादूटोणा, जारणमारणविद्या, वशिकरण मंत्र यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. समाजातील अंधश्रध्दा व भोळ्या समजुती यांविषयीची माहिती आपणास होते. अथर्वेदाच्या एकून दोन संहिता आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here